मुंबई : 16 व्या मजल्यावरुन वृद्धेने घेतली उडी | पुढारी

मुंबई : 16 व्या मजल्यावरुन वृद्धेने घेतली उडी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मानसिक नैराश्यातून सिताबाई शिवाजी माने या 65 वर्षीय वृद्धेने सोळाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मुलुंडमध्ये घडली.

आर. पी रोड, भीमवाडीतील निवासी इमारतीत सिताबाई मुलगा व सूनेसोबत राहत होती. गेल्या काही महिन्यांपासून मानसिक नैराश्य आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याचा फायदा होत नसल्याने त्यांचे नैराश्य वाढले होते. सोमवारी दुपारी त्यांनी घराच्या बाल्कनीतून उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच सोसायटीच्या रहिवाशांनी मुलुंड पोलिसांना ही माहिती दिली. सिताबाई यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Back to top button