Breaking ! पुण्यातील गोळीबार थांबेना ! माचीस मागितली म्हणून झाडल्या गोळ्या | पुढारी

Breaking ! पुण्यातील गोळीबार थांबेना ! माचीस मागितली म्हणून झाडल्या गोळ्या

पुणे : पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल लाॅक केल्यानंतर गोळी झाडली गेली नाही. तर शेवाळवाडी हडपसर येथे व्यवसायीक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या. या दोन घटनांना काही कालावधी लोटतो आहे ना तोपर्यंत सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा

Back to top button