भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर; संयुक्त राष्ट्राचा अहवाल | पुढारी

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : भारताची लोकसंख्या 144 कोटींवर गेली असून, यात 14 वर्षांपर्यंत वयोगटातील लोकसंख्येचा वाटा तब्बल 35 कोटी एवढा आहे. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) या विभागाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

भारताची लोकसंख्या गेल्या 77 वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे. अहवालात भारताची लोकसंख्या 144 कोटी 17 लाख नोंदविण्यात आली आहे.

2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले होते. चीनची लोकसंख्या 142.5 कोटी आहे. भारत सरकारच्या 2011 मधील अखेरच्या जनगणनेत 121 कोटी लोकसंख्येची नोंद करण्यात आली होती. भारतात अपंग महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचा धोका अपंग पुरुषांपेक्षा 10 पटीने जास्त आहे, असे या अहवालात नमूद आहे. शारीरिक संबंधात पुरुष महिलांवर वर्चस्व गाजवतात, असेही हा अहवाल सांगतो.

हेही वाचा : 

Back to top button