कोल्‍हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईला तिरूपती देवस्‍थानकडून मानाचा शालू अर्पण | पुढारी

कोल्‍हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईला तिरूपती देवस्‍थानकडून मानाचा शालू अर्पण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात येतो. आज (बुधवार) (दि. १८) तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे देवस्थान प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर शालू घेऊन सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी हा शालू स्वीकारला. केशरी रंगाचा सोनेरी काठ पदर असलेला हा शालू आहे. त्याची किंमत एक लाख सहा हजार ५७५ रुपये इतकी आहे.

तिरुपतीवरून करवीर निवासिनी अंबाबाईला प्रतिवर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धनाजी जाधव, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नर्लेकर उपस्थित होते. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडल्यानंतर आई अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला. अनेक वर्षांपासून तिरुमला तिरुपती देवस्थानकडून आई अंबाबाई ला शालू पाठवण्याची प्रथा आहे.

हेही वाचा : 

Back to top button