महत्त्वाची बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठीची वेळ वाढवली | पुढारी

महत्त्वाची बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठीची वेळ वाढवली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवार (दि.16) पासून सुरुवात झाली. परंतु निवडणूक आयोगाची ऑनलाईन संकेतस्थळ डाऊन असल्याने इच्छुक उमेदवारांना दोन दिवस अर्ज दाखल करता आला नाही. याबाबत तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील तीन दिवस म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2023 अखेर पर्यंत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 16 ते 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी प्रथम ऑनलाईन अर्ज दाखल करून या अर्जांची प्रिंट काढून तो अर्ज संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करायचा आहे.परंतु दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ डाऊन असून इच्छुकांना अर्ज दाखल करता आले आला नाही. संकेतस्थळ ओपन होत नाही, ओपन झाले तर कागदपत्र अपलोड करता येत नाही, अर्ज भरला, कागदपत्र अपलोड झाली तर अर्जाची प्रिंटच निघत नाही अशा अनेक अडचणी असल्याने उमेदवारी अर्जच दाखल करता आला नाही. यामुळेच आता आयोगाने अर्ज दाखल करण्याच्या वेळेत वाढ केली आहे.

Back to top button