Raj Thackeray | पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मनसे उमेदवार देणार; राज ठाकरे याची घोषणा | पुढारी

Raj Thackeray | पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मनसे उमेदवार देणार; राज ठाकरे याची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उमेदवार पदवीधर असला पाहिजे, पण मतदार पदवीधर असला पाहिजेत असं काही नाही. ही लोकशाही आहे. पण उमेदवार पदवीधर नसला तरी चालेल मतदार पदवीधर असावा असे आमचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक शाखा अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी फॉर्म भरून घ्यावेत. मुंबई, कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघाचा मनसेकडून आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आगामी पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याची महत्त्वाची घोषणा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली. मुंबईतील दादर सावरकर सभागृहात मनसेची आज (दि.१८) महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. (Raj Thackeray )

Raj Thackeray: वेळ आल्यास इंजिनमधून वाफ काढू; राज ठाकरेंचा इशारा

यावेळी पुढे बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, राज्यात अर्धा पक्ष बाहेर, अर्धा पक्ष सत्तेत अशी महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती आहे. पण राज्यात असं राजकारण कधीच नव्हतं, असेही ते म्हणाले. चिपळूणमधील १४० कोटींचा उड्डाणपूल अचानक कोसळला. करोडो रूपये वाया गेले. रस्त्यावर लोकांचे जीव जातात पण याचे कोणालाही काही वाटत नाही. कोणालाही याचा राग येत नाही. कोणी संबंधित मंत्री, नेत्यांचा राजीनामा मागत नाही. त्यामुळे वेळ आल्यास मनसेच्या इंजिनमधून वाफ बाहेर काढणार. इंजिनचे चटके सत्ताधाऱ्यांना बसलतील असा इशारा देखील राज ठाकरे यांनी या बैठकीदरम्यान दिला. (Raj Thackeray)

प्रत्येक टोलनाक्यावर ९० कॅमेरे लावावेत; राज ठाकरे

टोलनाके, चिपळून दुर्घटना, रस्त्यावरी वाढते अपघात यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. गणेशोत्सवादरम्यान गोवा-मुंबई महामार्गाची एक लेन सुरू करणार बोलले होते, त्याचं काय झाले? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. राज्यात प्रत्येक टोलनाक्यावर मनसेची नजर, प्रत्येक टोलनाक्यावर ९० कॅमेरे लावावेत अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीदरम्यान बोलताना सरकारकडे केली.

हेही वाचा:

Back to top button