Sikkim flood : लष्कराचे तब्बल 23 जवान पुरात बेपत्ता; तीन नागरिकांचा मृत्यू | पुढारी

Sikkim flood : लष्कराचे तब्बल 23 जवान पुरात बेपत्ता; तीन नागरिकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन : सिक्कीममध्ये तिस्ता नदीच्या पुराणे रौद्ररूप धारण केले आहे. लाचुंग व्हॅलीत आलेल्या या प्रलयात लष्कराचे 23 जवान बेपत्ता असून 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीने तिस्ता नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. चुंगथांग धरणाच्या पाण्यात वाढ झाल्यानंतर विसर्गामुळे तिस्ता नदीची पाणी पातळी अचानक वाढली. 15 ते 20 फुट वाढलेल्या या पातळीमुळे पुराने रौद्ररूप धारण केले. तिस्ताच्या पात्रातून 3 मृतदेह आतापर्यंत सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. सिक्कीम ते पश्चिम बंगालला जोडणारा हायवे पुरात वाहून गेला असून गँगटॉकचाही संपर्क तुटला आहे.

मंगन जिल्ह्यातील ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लडची परिस्थिती लोनाक सरोवरात निर्माण झाली त्यामुळे नद्यांच्या वेगात कमालीची वाढ झाली. 4 ऑक्टोबर, 2023 च्या पहाटे तीस्ता नदीच्या खोऱ्याच्या खाली असलेल्या प्रवाहामुळे मंगन, गंगटोक, पाकयोंग आणि नामची जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.सेनाचे तेवीस जवान बेपत्ता आहेत आणि 41 वाहने आता गाळात अडकली आहेत, असे संरक्षण पीआरओ विंग कमांडर हिमांशू तिवारी यांनी सांगितले. अचानक आलेल्या पुरामुळे लाचेन खोऱ्यातील अनेक लष्करी ऑफिसेसचेही नुकसान झाले आहे.

अलर्ट जारी..

भारतीय हवामान खात्याने गंगटोक, ग्यालशिंग, पाकयोंग आणि सोरेंग जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगन आणि नामची जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पुराची तीव्रता पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, आतापर्यंत 10,000 लोकांना सखल भागातून हलवण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button