Ganesh Utsav Tamil Nadu : गणेश मिरवणुकीत ‘तो’ बुरखा घालून नाचला अन्; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Ganesh Utsav Tamil Nadu : गणेश मिरवणुकीत 'तो' बुरखा घालून नाचला अन्; व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ganesh Utsav Tamil Nadu : देश विदेशात सध्या सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या दिवशी ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. गणेश मिरवणुकीत नाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तामिळनाडूत एक व्यक्ती बुरखा घालून गणेश मिरवणुकीत नाचत होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण…

संबंधित बातम्या :

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या उत्सवात बुरखा घातलेला आणि नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 21 सप्टेंबरला व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक पुरुष बुरखा घालून नाचत असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे. त्या व्हिडिओवरून पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. मिळालेल्या तक्रारीच्या आणि व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास केला. (Ganesh Utsav Tamil Nadu)

या प्रकरणी वेल्लोर पोलिसांच्या पथकाने बुरखा घालून नाचणाऱ्या या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. हा माणूस विरुथमपट्टू येथील असून त्याचे नाव अरुणकुमार असे आहे.

दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अरुणकुमारला अटक करण्यात आली. धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही पोलिसांनी दिला आहे. मात्र, अरुण हा बुरखा घालून का नाचत होता. त्यामागे त्याचा काय हेतू होता. धार्मिक तेढ निर्माण करणे या हेतूने ही कृती करण्यात आली आहे का याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, या गुन्ह्यातील इतरांचा पोलिस शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. (Ganesh Utsav Tamil Nadu)

हे ही वाचा :

Back to top button