मुंबई : गणेश विसर्जनाला ५५ देशांच्या राजदूतांची उपस्थिती असणार | पुढारी

मुंबई : गणेश विसर्जनाला ५५ देशांच्या राजदूतांची उपस्थिती असणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव काळात दरवर्षी १२००० गणेश मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. यात घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणेशउत्सव मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यंदा ५५ देशांच्या राजदूतांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच थायलंड राजदूत कार्यालयातील गणपतीची पूजा, आरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

गणपतीचे विसर्जन योग्य प्रकारे होण्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, वाहतूक विभाग तसेच बेस्ट प्रशासनातर्फे एक महिनाआधीच सर्व गोष्टींचे नियोजन आणि बैठका आयोजित केल्या जातात. त्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी जोमाने कामाला लागतात. बेस्ट प्रशासन, गणेशोत्सव समन्वय समिती, मनपा जनसंपर्क विभाग, झाडू खात्याचे कर्मचारी यांच्यासाठी देखील मंडप बांधण्यात आले आहेत. जेलीफिषचा दंश होणाऱ्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाचा मंडप आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गाड्या पार्क करण्यासाठी खास वेगळी सोय करण्यात आली आहे. फिरत्या शौचालये बांधण्यात आली आहेत. हे सर्व काम डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षण विभागाचे अधिकारी संजय पोळ आणि मनोज जेऊर्कर पाहत आहेत.

  • मंत्री, आमदार, खासदार राज्यपाल शासनाचे उच्च अधिकारी आणि व्हीआयपी पाहुण्यांसाठी गिरगाव चौपाटीवर एक भला मोठा शामियाना उभारला आहे. शामियान्याला लागूनच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचे मंडप उभारण्यात आला आहे. परदेशर नागरिकांसाठी खास काचेच्या केबिन असलेला तंबू उभारला गेला आहे.

Back to top button