‘ड्रग्ज पार्टी ची टीप मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्याच्या निकटवर्तीयाकडून’ | पुढारी

‘ड्रग्ज पार्टी ची टीप मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्याच्या निकटवर्तीयाकडून’

मुंबई, पुढारी ऑनलाईन

क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार असून त्यात मोठे लोक सहभागी होतील, अशी टीप मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने सतीश भानुशाली याला दिली होती. त्यानंतर त्यांनी एनसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यावर छापा टाकायला लावला. मनीष भानुशाली, सॅम डिसुझा आणि किरण गोसावी हे तिघांचा या प्रकरणाशी संबंध आहे, असा खुलासा या प्रकरणात नाव आलेला सुनील पाटील याने केला.

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुनील पाटील याने अनेक खुलासे केले. या प्रकरणातील मनीष भानुशाली याने मारहाण केल्याचेही त्याने मुलाखतीत सांगितले.

सुनील पाटील म्हणाला, ‘ड्रग्ज प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मनीश भानुशालीला क्रूझची टीप आली होती. मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्याचा जवळच्या व्यक्तीने ही टीप दिली होती. त्या क्रूझवर मोठी मोठी लोकं जाणार आहेत असे सांगितले. त्यावेळी मी, भानुशाली, किरण गोसावी हे एकत्रच हॉटेलमध्ये होते. त्यावेळी या दोघांनी या टीपवर काम करायचे आहे असे सांगितले. त्याला मी नकार दिला. किरण गोसावी, मनीष भानुशाली हे दोघे गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये मंत्रालयात गेले होते.

मध्यप्रदेशातून टीप

रात्री साडेआठ वाजता ते परतून आल्यानंतर नीरज नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने मला खूप प्रयत्न करून काहीही करून ही माहिती एनसीबीपर्यंत पोहोचवायची असे सांगितले. मात्र, मी नकार दिला. मी सॅम डिसुझा याचा नंबर दिला. त्यानंतर छापा टाकताना हे तिघे सोबत होते. छापा टाकला त्या दिवशी मी वानखेडेंना शुभेच्छा दिल्या.

पैशांची मागणी

सॅम डिसुझा, किरण गोसावी शाहरूखच्या मॅनेजरशी डील करत होते. मध्यरात्री अडीच वाजता भानुशाली याने शाहरूखच्या मुलाला अटक झाल्याचे सांगितले. किरण गोसावी याने मला सेल्फी पाठविला. सकाळी आठ वाजता सॅम डिसुझा याचा मला फोन आला आणि ५० लाख रुपये किरण गोसावी मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांचा संपर्क करून दिला. पहाटे पाच वाजता सतीश भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा यांचे पूजा ददलानी हिच्याशी बैठक होऊन काही रक्कम ठरली होती. मात्र, पुढे काय झाले माहीत नाही.

ज्या दिवशी ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली. त्या दिवशीपासून मी अहमदाबादला होतो . दरम्यान मला मुंबई पोलिसांनी समन्स काढले. त्यानंतर मला भानुशालीने दिल्लीला बोलविले त्यानंतर मी कारने दिल्लीला गेलो. तेथे एका हॉटेलमध्ये मला थांबविले. त्यानंतर मी तेथे थांबले आणि मला बाहेर पडू नये असे भानुशालीने सांगितले. मी एक रात्र तेथे थांबलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी धुळ्याला जाणार असे सांगितले. त्यावर त्याने मला मारहाण केली.

ड्रग्ज पार्टी टीप  : कोण आहे सुनील पाटील

सुनील पाटील हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील असून. तो बबनराव पाचपुते यांचा कार्यकर्ता आहे. पाचपुते मंत्री असताना २००९ ते २०१४ या काळात पाटील सतत त्यांच्या बंगल्यावर दिसत असे. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या तो जवळ होता. मात्र, वादानंतर बाजुला गेला. मोहित कंबोज यांनी सुनील पाटीलच्या नावाने आरोप केल्याने तो चर्चेत आला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button