अन्नपदार्थ टिकवण्यासाठी प्राचीन काळी होते बर्फाची तळघरे | पुढारी

अन्नपदार्थ टिकवण्यासाठी प्राचीन काळी होते बर्फाची तळघरे

न्यूयॉर्कः

सध्या खाद्यपदार्थ किंवा अन्य वस्तू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शीतगृहे किंवा घरगुती पातळीवर रेफि—जरेटरचा वापर केला जातो. अर्थात अशी गरज किंवा त्यादृष्टीने केलेली सोय ही आधुनिक काळातच झाली असे नाही. जून्या काळातील लोक जमीनीखालील घरात बर्फ साठवून अशी सोय करून ठेवत असत.

याबाबत इराणी लोक आघाडीवर होते. इराणमध्ये यासाठी ‘यखचल’ नावाची शीतगृहे होती. इराणी लोक जमीनीखाली असलेल्या मोठ्या खोल्यांमध्ये बर्फ साठवून ठेवत. इसवी सनपूर्व 500 च्या सुमारास पदार्थ टिकवण्यासाठी आणि थंड ठेवण्यासाठी अशा शीतगृहांचा वापर केला जात असे. या बर्फघरांमध्ये वर्षभर बर्फ साठवता येत असे. हा बर्फ जवळच्या नद्या, तलाव यामधून मिळत असे. हिब्रू, ग्रीक, रोमन लोकही बर्फ साठवण्यासाठी मोठे खड्डे खणत व त्यामध्ये साठवलेला बर्फ वापरत. आजही बर्फघर किंवा आईस बॉक्सेससारख्या तंत्राचा वापर करून डोंगराळ भागात काही ठिकाणी अन्न, मांस, दूध टिकवून ठेवले जाते. कृत्रिमरित्या पदार्थ थंड करण्याचा म्हणजेच आर्टिफिशियल रेफि—जरेशनचा शोध विल्यम कलन नावाच्या स्कॉटिश संशोधकाने लावला.

Back to top button