शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांचे निधन | पुढारी

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांचे निधन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ बाबा सावंत (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाबा सावंत हे मूळचे करूळ (ता. गगनबावडा) येथील आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. वडील आत्माराम सावंत हे स्वातंत्र्यपूूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या विधीमंडळात सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. विद्यापीठ सेवक संघाचे संस्थापक व्ही.आर.पाटील यांच्यासह बाबा सावंत यांनी विद्यापीठाच्या उभारणीत योगदान दिले. १९९८ पासून ते सेवक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या संस्थापक सदस्य होते. मनोयुवा ज्येष्ठ नागरिक संघटेनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Back to top button