उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी | पुढारी

उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

‘शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून पक्षाचे नाव उज्वल करा’, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

नुकत्याच झालेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नाशिक लोकसभासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड त्याचप्रमाणे सुधाकर जाधव, योगेश नागरे, अरुण जाधव, श्रीराम गायकवाड, रंजना बोराडे हे संचालक निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे बँकेच्या चेअरमन पदावर दत्ता गायकवाड हे विराजमान झाले असून त्यांनी बुधवार (दि.28) आज मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करून भावी काळात चांगली कामगिरी करून पक्षाचे नाव व बँकेचे नाव उज्वल करा असे आवाहनहीउद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी पोपटराव गोडसे, राहुल बोराडे, गणेश गडाख व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button