Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी | पुढारी

Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत तीन वर्षांमध्ये ६७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा रुग्णालयाने ठेवत संबंधित ठेकेदाराकडे ३० लाखांची वसुलीची नोटीस पाठवली आहे. याबाबत ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे संबंधित चौकशीची व गैरव्यवहार झालेल्या बिलांची मागणी केली आहे. या बिलांची पडताळणी करून सोमवार (दि. १९) पर्यंत बाजू मांडण्यास ठेकेदाराने मुदत मागितली आहे. त्यामुळे सोमवारी ठेकेदाराचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील निर्णय ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी जळगावमधील कंपनीस कंत्राट दिले आहे. या कंपनीमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयांमधील रुग्णांसाठी लागणारे बेडशीट, उशीचे खोळ, ब्लॅकेंट्स, चादर, रुग्ण-डाॅक्टरांचे गाउन, शस्त्रक्रियांसाठी लागणारे कपडे नियमित धुण्याची जबाबदारी होती. मात्र शासनाकडे बिल सादर करताना आकड्यांमध्ये फेरफार करून वाढीव कपड्यांचे बिल घेत ठेकेदाराने ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला. त्यापैकी ३० लाखांचे बिल कंत्राटदारास देण्यात आले असून, उर्वरित ३७ लाखांचे बिल थांबवण्यात आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी संबंधित ठेकेदारास नाेटीस बजावून ३० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. यावर ठेकेदाराने बिलांची मागणी करीत शहानिशा करण्यास सोमवारपर्यंत मुदत मागितली आहे.

हेही वाचा:

Back to top button