Subramanian Swamy :’इंडिया शायनिंग’ ला कोणताही आधार नाही, सुब्रम्हण्यम स्वामी यांची टीका | पुढारी

Subramanian Swamy :'इंडिया शायनिंग' ला कोणताही आधार नाही, सुब्रम्हण्यम स्वामी यांची टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या आर्थिक स्थितीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जी काही आकडेवारी दिली आहे, त्याचा आपण अलिकडेच अभ्यास केला आहे. या अभ्यासाअंती सरकार ‘इंडिया शायनिंग’ चा जो दावा करीत आहे, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येत असल्याची टीका भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

सरकाने काही दिवसांपूर्वी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली होती. कोरोना संकटकाळानंतर आलेली सुधारणा वगळली, तर जीडीपीचा आकडा केवळ चार टक्के इतका भरतो. थोडक्यात नेहरु पंतप्रधान असतानाच्या काळात जो जीडीपी दर होता, तोच आजही आहे, असा टोला स्वामी यांनी मारला. यासंदर्भातील सविस्तर  विश्लेषण आपण लवकरच देऊ, असेही स्वामी (Subramanian Swamy) यांनी नमूद केले आहे.

सरकारने अलिकडेच जीडीपीचे आकडे जाहीर केले होते, त्यानुसार सरत्या आर्थिक वर्षात 7.2 टक्के इतका जीडीपी दर साध्य झाला होता. दुसरीकडे चौथ्या तिमाहीत हा दर 6.1 टक्के इतका नोंदविला गेला होता. चौथ्या तिमाहीतील आकडे अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा चांगले आले होते.

हेही वाचा 

Back to top button