

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरच्या सेरोमध्ये बंडखोरांशी सोमवारी झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. तर आसाम रायफल्सचे दोन जवान गोळीबारात जखमी झाले आहेत. जखमी जवानांना मंत्रिफुखरी येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरक्षा दर आणि बेडखोर यांच्यात गोळीबार झाला. सुगनू परिसरात झालेल्या या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहिद झाला. तसेच असाम राईफल्सच्या दोन जवानांना गोळ्या लागल्या आहेत. आंदोलकांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने सांगितले. आसाम रायफल्सच्या जवानांना मंत्रीपाखुरी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. परिसरातील उर्वरित टीम गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफ जवान रंजीत यादव गोळीबारमध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी काकचिंग येथील जीवन ज्योती रूग्णालायात दाखल केले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :