Jammu and Kashmir : सैन्य अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू | पुढारी

Jammu and Kashmir : सैन्य अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील अंडवान सागरम भागात आज (दि.१४) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. याबाबत पोलिसांनी रविवारी (दि.१४) सकाळी ट्विट करत सांगितले. सध्या दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने घुसून लष्कराच्या जवानांवर हल्ले करत आहेत. (Jammu and Kashmir)

याआधी शनिवारी (दि.१३), भारतीय लष्कराच्या जवानांनी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ३ मे रोजीही भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लाच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या  चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी ठार केले होते. (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांसोबत असलेली एके-47ही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button