Odisha Jharsuguda Bypoll : मंत्री पित्याच्या हत्येनंतर ओडिशातील पोटनिवडणुकीत मुलीने मारली बाजी

Odisha Jharsuguda Bypoll : मंत्री पित्याच्या हत्येनंतर ओडिशातील पोटनिवडणुकीत मुलीने मारली बाजी
Published on
Updated on

भूवनेश्वर; पुढारी ऑनलाईन : ओडिशातील झारसुगुडा विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बीजू जनता दलाने मोठा विजय नोंदवला आहे. या जागेवर बीजेडीच्या (biju janata dal) दीपाली दास (Dipali Das) यांनी भाजपचे उमेदवार तन्खाधर त्रिपाठी यांचा ४८ हजार मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. बीजू जनता दलाचे व ओडिशाचे दिवंगत आरोग्य मंत्री नबा किशोर दास (Naba Kishore Das) या मतदारासंघाचे प्रतिनिधीत्व करत असत. जानेवारीमध्ये त्यांच्या सुरक्षारक्षकाने गोळी घालून त्यांच्या हत्या केली होती. यानंतर रिकाम्या असेलेल्या जागेसाठी पारपडलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलीने जोरदार यश नोंदवले आहे. (Odisha Jharsuguda Bypoll)

या निवडणुकीतील विशेषबाब म्हणजे दिवंगत बीजेडी नेते नबा किशोर दास यांच्या तुलने त्यांच्या मुलीला अधिक मते मिळाली आहेत. वडिलांच्या तुलनेत मुलीला ८५७८ इतकी अधिक मते मिळाली आहे. तर विजयातील अंतर ३,०२२ मतांनी वाढले आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार दीपाली दास यांना १.०७ लाख मते मिळाली, तर तन्खाधर त्रिपाठी यांना ५८,३८४ मते मिळाली आहेत. काँग्रेसच उमेदवार तरुण पांडे हे तिसऱ्या स्थानी राहिले असून त्यांना ४४७३ इतकी मते मिळाली आहेत. (Odisha Jharsuguda Bypoll)

या मोठ्या विजयानंतर दीपाली दास म्हणाल्या की, हा झारसुगुडातील लोकांचा विजय आहे. जे माझ्या वडिलांशी प्रेम करत होते. हा विजय नाबा दास यांचा आहे. हा त्या जनतेचा विजय आहे जे लोक मुख्यमंत्री आणि बीजू जनता दल यांच्याशी जोडले गेले आहेत. (Odisha Jharsuguda Bypoll)

दीपाली दास यांच्या वडिलांचा व तत्कालिन आरोग्य मंत्री नबा किशोर दास याची २९ जानेवारी रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यानंतर दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

नबा किशोर दास यांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या विधानसभा जागेवर त्यांची मुलगी दीपाली दास उभ्या राहिल्या आणि त्यांनी येथे मोठा विजय नोंदवला. खाणींचा केंद्र म्हणून ओळख असलेल्या झारसुगुडा जिल्ह्यात नब किशोर दास यांचा स्वत:चा दबदबा होता. २०१९ च्या निवडणुकीपुर्वी नबा किशोर दास बीजदमध्ये प्रवेश करण्याआधी ते काँग्रेसचे नेते होते.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news