Sameer Wankhede And Shahrukh Khan : ‘जैसे ज्याचे कर्म तैसे’…समीर वानखेडेंवरील सीबीआयच्या कारवाईनंतर शाहरुखच्या ‘त्या’ट्वीटची चर्चा | पुढारी

Sameer Wankhede And Shahrukh Khan : ‘जैसे ज्याचे कर्म तैसे’...समीर वानखेडेंवरील सीबीआयच्या कारवाईनंतर शाहरुखच्या ‘त्या’ट्वीटची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीआयने अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनीच ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली होती. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईनंतर शाहरुख खानचा एक जुना ट्वीट व्हायरल होत आहे. ज्या ट्वीटमध्ये शाखरुने ‘जैसे ज्याचे कर्म तैसे,फळ देतो रे ईश्वर’ या गीतांच्या ओळीला साधर्म्यसाधतील अशा ओळी लिहल्या होत्या. (Sameer Wankhede And Shahrukh Khan)

कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अन्य दोन अधिकारी, या प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि अन्य काही जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. (Sameer Wankhede And Shahrukh Khan)

शाहरुख खानचे ट्वीट (Sameer Wankhede And Shahrukh Khan)

तीन महिन्यापुर्वी शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिट झाल्यावर त्याने २० फेब्रुवारी रोजी हॅशटॅग आस्क एसआरके (#AskSRK) हा सेशन ठेवला होता. यावर एका चाहत्याने शाहरुखला एक विनोदी जोक सांग सांगा असे म्हणाला. शाहरुख खानला त्याच्या हजरजबाबीपणावर आणि विनोदाच्या टाईमिंगसाठी मानले जाते. चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख चांगलाच सिरियस झाला आणि त्याने ट्वीट मध्ये म्हटंले की, ‘एक नवे रेस्टॉरंट उघडले आहे, तेथे कोणताही मेन्यू नाही. पण, तुम्हाला तेच मिळेल जी तुमची लायकी असेल’.

आता समीर वानखेडे यांच्यांवर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर शाहरुख खानचा हा जुना ट्वीट चांगलाच व्हायल होत आहे. हे जुने ट्वीट व्हायरल होत असल्याने, लोकांचा हा गैरसमज झाला आहे की, वानखेडे यांच्या अटकेनंतर शाहरुखने या पद्धतीने ट्वीट करुन आपली प्रतिक्रीया दिली आहे. (Sameer Wankhede And Shahrukh Khan)

नेमके काय आहे प्रकरण

२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. येथून आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल त्या लोकांवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आर्यनला २८ दिवस तुरुंगात काढावे लागले होते. २७ मे २०२२ रोजी एनसीबीने आरोपपत्रातून आर्यन खानचे नाव काढून टाकले. त्याच सुमारास समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बदली करण्यात आली. त्यांना डायरेक्टरेट जनरल टॅक्सपेअर सर्व्हिसेस, चेन्नई येथे पाठवण्यात आले.

आर्यनचे करिअरवर लक्ष

या सर्व अडचणींना तोंड देत आर्यन खानने आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच, त्याने D’yavol X नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. आर्यनने शाहरुख खानसोबत या ब्रँडची जाहिरातही दिग्दर्शित केली होती. हे त्याचे दिग्दर्शनातील पदार्पण मानले गेले. सध्या तो ‘स्टारडम’ नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे. आर्यनने स्वत: चित्रपटसृष्टीवर आधारित ही मालिका लिहिली असून त्याचे दिग्दर्शनही करणार आहे. याची निर्मिती शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट करत आहे.

अधिक वाचा :

Back to top button