जागतिक बिबट्या दिन : ‘लेपर्ड वॉरियर’ने वाडेकरांचा सन्मान | पुढारी

जागतिक बिबट्या दिन : ‘लेपर्ड वॉरियर’ने वाडेकरांचा सन्मान

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

जागतिक बिबट्या दिनानिमित्ताने बिबट्या संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना ‘लेपर्ड वॉरियर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शासनाच्या वनविभागात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असताना जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक बिबट्यांचा त्यांनी बचाव केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण, वन्यजीव, बिबट्यांचे व्यवस्थापन संदर्भात सुनील वाडेकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना लेपर्ड वॉरियर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लेपर्ड वॉरियर पुरस्कार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्या हस्ते देण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button