नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक संशयित ताब्यात | पुढारी

नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक संशयित ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील गोळीबाराची चर्चा सुरु असताना सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर अंतर्गत वादातून एका टोळीने दुचाकीवर येत गोळीबार केला. या घटनेत राकेश कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिडकोतील साईबाबानगर येथे राकेश कोष्टी राहतो. कोष्टी नेहमी प्रमाणे देवळात दर्शनासाठी मित्राला घेऊन दुचाकीवर दत्तचौक मटन मार्केट कडून बाजीप्रभु चौकातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर तीन जण आले. त्यातील एकाने कोष्टीच्या पाठीवर दोन गोळीबाराच्या फैरी झाडल्या यात कोष्टी जखमा झाला. कोष्टीच्या समवेत असलेल्या मित्राने त्याला त्वरीत उत्तमनगर येथील कल्पतरु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संशयित आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाले आहे.  यामध्ये राकेश कोष्टीचे जया दिवे, किरण शेळके, ठाकूर यांच्याशी जुने वाद होते. या वादातून त्याच्यावर सिडकोतील बाजीप्रभु चौकात गोळीबार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते. पोलिसांनी जया दिवेला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. राकेश कोष्टी भाजपा माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष असून त्याच्या विरोधात यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा:

Back to top button
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती हॉट शालिनीनं जंगलात लावली आग… हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा किलर अवतार! हॉट पूजा गौरचे साडीतील सोज्वळ रूप पाहिले का ? (web story) हॉट दिशा पटानीची व्हायरल किक (Video) हॉट क्रितीचा ऑरेंज फ्लोलर रफलमध्ये भन्नाट देशी लूक हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा हेमांगी कवी – ये Pool राणी, असचं तुझ्यासारखं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे हे काय! झगा मगा मला बघा
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत