सिद्धू यांचा राजीनामा; कॅप्टन अमरिंदर सिंग ट्विट करून म्हणाले, हा माणूस… | पुढारी

सिद्धू यांचा राजीनामा; कॅप्टन अमरिंदर सिंग ट्विट करून म्हणाले, हा माणूस...

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योत सिद्धू यांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून भाष्य केले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर नवज्योत सिद्धू चांगलेच चर्चेत आले होते.

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा देताना सिद्धू हे पक्ष आणि देशासाठी घातक असल्याचे सांगितले होते.

त्यांचे पाकिस्तानी नेते आणि नोकरशहांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

kirit somaiya : किरीट सोमय्यांनी मंत्री मुश्रीफांवर पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारींची यादी वाचली का?

रश्मी रॉकेट : बॉडीवरून टीका करणाऱ्यांना तापसी पन्नूचे खडेबोल

मात्र, सिंग यांनी राजकीय हेतूने आरोप केल्याचे बोलले जात होते.

मात्र आता सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेसला तोंडघशी पाडल्यानंतर सिंग यांनी ट्विट करून काँग्रेसला सुनावले आहे.

सिद्धू यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘एखाद्याच्या चारित्र्याचा ऱ्हास तडजोडीने सुरू होतो.

मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी कधीही तडजोड करू शकत नाही.

त्यामुळे मी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. मी काँग्रेसची सेवा करत राहीन.’ यावर सिंग यांनी ट्विट केले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते न मिळाल्याने सिद्धू नाराज होते. त्यांच्यात आणि सिंग यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती.

या सगळ्या संघर्षाची परिणिती सिंग यांच्या राजीनाम्यात झाली. सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास भाग पाडले ते सिद्धू यांच्यामुळे. सिद्धू यांच्या नेतृत्वाला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची संमती होती. त्यामुळे सिंग हे काँग्रेसवर नाराज होते. या नाराजीतून ते पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही,’

KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सला सहावा झटका, अक्षर पटेल बाद

गायत्री दातारचा प्रियकर तिचा ‘हा’ प्रस्ताव मान्य करणार का?

सिद्धूंचे कुणाशीच जुळेना

नवज्योत सिंग सिद्धू वाचाळ आहेत. तसेच ते तडकाफडकी निर्णय घेण्यात माहीर आहेत. त्यामुळे त्यांचे कुणाशीच पटत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला करिष्मा दाखवत पंजाबमध्ये सत्ता आणली होती. त्यानंतर कॅप्टन यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. तेव्हापासून संघर्ष सुरू होता. सध्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे सिद्धू यांच्या जवळचे मानले जातात. मात्र, चन्नी यांनी स्वतंत्र कारभार सुरू केल्याने सिद्धू अस्वस्थ होते. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये चन्नी यांनी सिद्धू ऐकले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यातून सिद्धू यांचा राजीनामा झाला असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button