KKR vs DC : केकेआरचा दिल्लीवर 3 विकेट्सने विजय! | पुढारी

KKR vs DC : केकेआरचा दिल्लीवर 3 विकेट्सने विजय!

अबुधाबी; पुढारी वृत्तसेवा : Kolkata vs Delhi : आयपीएल फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. जिथे केकेआरने 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि 3 गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने 10 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. संघाच्या विजयात नितीश राणाने 27 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या, तर सुनील नरेनने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची पहिली विकेट व्यंकटेश अय्यर (14) च्या रूपात पडली. त्याची विकेट ललित यादवच्या खात्यात आली. दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (9) बाद झाला. आवेश खानने त्याला माघारी धाडले. यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी डाव हाताळण्याचे काम केले.

गिल एका टोकाशी खेळत होता, पण नंतर कागिसो रबाडाने त्याला बाद केले आणि दिल्लीला तिसरे यश मिळवून दिले. पुढच्याच चेंडूवर आर अश्विनने कॅप्टन मॉर्गनला शून्यावर बाद करत केकेआरची पाठ मोडली. मॉर्गनला बाद केल्यानंतर अश्विन खूप उत्साही दिसत होता. कोलकात्याची सहावी विकेट दिनेश कार्तिक (12) च्या रूपात पडली. दिल्लीकडून अवेश खान 3 विकेट घेण्यात यशस्वी झाला.

त्यानंतर केकेआरच्या विजयात नितीश राणाने 27 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या, तर सुनील नरेनने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली.

Back to top button