Monsoon 2024 : खुश खबर!, दक्षिण-पश्चिम मॉन्सून ४८ तासांत भारतात होणार दाखल

Monsoon 2024 : खुश खबर!, दक्षिण-पश्चिम मॉन्सून ४८ तासांत भारतात होणार दाखल
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात उष्णतेची प्रचंड लाट सुरू आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात कुठलाही बदल होणार नसल्याचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे. उष्णतेपासून दिलासा देणारी बाब म्हणजे, दक्षिण पश्चिम मॉन्सून वेळेआधीच दाखल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

पुढील ४८ तासांमध्ये दक्षिण-पश्चिम मॉन्सून दक्षिण अंदमान सागर, दक्षिण पूर्व बंगालच्या खाड़ीतील काही भाग आणि निकोबार द्वीप समुहाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच दक्षिण भारतात पाऊस पडू लागला आहे. भारतीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ मे रोजी मॉन्सून अंदमान सागर आणि बंगालच्या खाड़ीत प्रवेश करणार आहे. केरळमध्ये तो ३१ मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीत पाऊस पडू लागला आहे.

वेधशाळेने १८ ते २० मे दरम्यान केरळच्या मलप्पूरम आणि वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आणि इतर आठ जिल्ह्यांमध्ये 'येलो अलर्ट' जारी केला आहे. २१ मे पर्यंत लोकांनी समुद्रापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे. याकाळात मोठ्या वादळासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वेधशाळेने पुढील तीन दिवसांत पूर्व-मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण भारतात २३ मे पर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोंकणसह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, मध्य प्रदेश आदी भागांमध्ये १८ व १९ मे रोजी वीज आणि ताशी ३० ते ४० किमी प्रती तास क्षमतेच्या वादळासह हलका व मध्यम पाऊस होण्याचा अंदाजही वेधशाळेने वर्तविला आहे.

राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंडीगड, दिल्ली, पश्चिम-पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरातच्या काही भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news