Suicide : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीची पुण्यात आत्महत्या | पुढारी

Suicide : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीची पुण्यात आत्महत्या

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून देत पलायन करणाऱ्या पतीने पुण्याच्या आंबेगाव टेकडीवर आत्महत्या (Suicide) केली, असल्याचे निदर्शनास आले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून घोडे व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (वय-५५. रा. महाबळेश्वर) याने १ सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या पत्नीला म्हणजेच बायना राजेंद्र जाधव (रा. महाबळेश्वर) हिला अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते.

आपल्या पत्नीला पेटविल्यानंतर राजेंद्रने पलायन केले होते. मात्र, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. शेवटी मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. महाबळेश्वर पोलीस या फरार राजेंद्र जाधव याचा शोध घेत होते.

दरम्यान, शनिवारी पुण्यातील आंबेगाव टेकडीवर फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला एका माणसाचा कुजलेल्या आणि डोके नसलेला अवस्थेत मृतदेह दिसला. त्याने तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तपासाअंती हा मृतदेह राजेंद्र महादेव जाधव याचा असल्याचे निष्पन्न झाले.

प्रथमदर्शनी ही आत्महत्या (Suicide) असून प्राण्यांनी मृतदेहाचे काही भाग फाडून टाकले असल्याने छिन्नविछिन्न मृतदेह झाला होता, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी सांगितले. रविवारी त्याचा मृतदेह मुलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राजेंद्र जाधव हा महाबळेश्वर येथे घोडे व्यवसायिक होता.

पहा व्हिडीओ : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

हे वाचलंत का? 

Back to top button