छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथे अंबाडी प्रकल्पाजवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात; एक महिला ठार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथे अंबाडी प्रकल्पाजवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात; एक महिला ठार

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापुर महामार्गावरील कन्नड जवळील अंबाडी धरणाजवळ इंडीका कार आणि ट्रक्टरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ५७ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) दुपारी १च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील रमाबाई संजय गायकवाड (५७) चैतला विनोद गायकवाड ( १३) सुरज पलाश पवार (२२) पंचशील विनोद गायकवाड (३१) कविता तुळशी राम शिंगारे (६१)संगतम गणेश शिंगारे, (६१) मयुरी गणेश शिंगारे (४) विनोद संजय गायकवाड (४३) हे एम.एच. १२ एन.बी.००४८ या वाहनातून कन्नडहुन सोलापुर-धुळे महामार्गावरुन जात असताना अंबाडी धरणाजवळ ट्रँक्टरसोबत समोरासमोर धडक झाली.

या धडकेत प्रवासी वाहनातील रमाबाई संजय गायकवाड (वय ५७ रा.थेरगाव ता. हवेली जि.पुणे) या महिला गंभीर जखमी झाल्या यावेळी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची घटनेची नोंद झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत सोनवणे, दिनेश खेडकर करत आहे.

Back to top button