Nashik Graduate Constituency : नाशिकमधून शुभांगी पाटील; तर नागपूरमधून कोण?  | पुढारी

Nashik Graduate Constituency : नाशिकमधून शुभांगी पाटील; तर नागपूरमधून कोण? 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत नाशिक  मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या माघारीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार असल्‍याचे आज( दि. १९)  जाहीर केले.

सत्‍यजीत तांबे यांच्यावर आज निलंबनाची कारवाई  करण्यात आली. महाविकास आघाडीच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत  राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले हे उपस्‍थित होते. यावेळी नाना पटोले म्‍हणाले की, नाशिकमध्‍ये मविआ शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला जाईल.

Nashik Graduate Constituency : नागपूरमधून कोण? 

महाविकास आघाडीच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत नाशिकमध्‍ये मविआ शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार असे म्हंटले. त्याचबरोबर यावेळी नागपूरमध्‍ये सुधाकर आडबोले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे  आणि कोकणमधून बाळाराम पाटील हे मविआचे उमेदवार असतील असेही जाहीर केले. 

हेही वाचा

Back to top button