सोनिया गांधींची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल | पुढारी

सोनिया गांधींची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर याआधीपासून या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी वधेरा या देखील त्यांच्यासोबत आहेत. सोनिया गांधी यांना श्वसनाच्या संसर्गाचा त्रास होत आहे. मंगळवारपासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर सात किलोमीटर चालले व त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी दिल्लीला परतले होते.

याआधी सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १२ जून रोजी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना २ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. २४ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये भारत जोडो यात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा :

Back to top button