Gold Prices Today | आर्थिक मंदीत सोन्याला झळाळी, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Prices Today | आर्थिक मंदीत सोन्याला झळाळी, जाणून घ्या नवे दर

Gold prices Today : जगभरात आर्थिक मंदीची भिती तसेच डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सेफ हेवन मालमत्ता म्हणून गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढला आहे. परिणामी मागणी वाढून दर वाढले आहेत. आज बुधवारी (दि.४) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५५,९०५ वर खुला झाला. तर चांदीचा व्यवहार प्रति किलो ६८,८८० रुपयांवर केला जात आहे. काल मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५५,५८१ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. त्यात आज वाढ दिसून आली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,९०५ रुपये, २३ कॅरेट ५५,६८१ रुपये, २२ कॅरेट ५१,२०९ रुपये, १८ कॅरेट ४१,९२९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३२,७०४ रुपयांवर खुला झाला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६,२०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. आता सोने ५६ हजारांजवळ पोहोचले आहे.

सोने सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ

सोन्याचे दर सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ गेले आहेत. MCX वर सोने फ्यूचर्स ०.४ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५५,७४० रुपयांवर तर चांदी ०.३ टक्क्यांनी वाढून प्रति किलो ७०,१३५ रुपयांवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या घसरणीचा सोन्याला आधार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज स्पॉट गोल्ड ०.३ टक्के वाढून प्रति औंस १,८४४.८५ डॉलरवर पोहोचले. (Gold prices Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

 

Back to top button