पुणे: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित | पुढारी

पुणे: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित

तळेगाव स्टेशन (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खाजगीकरणाच्या विरोधात बुधवारपासुन वीज कर्मचारी,अधिकारी अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे. संपाला सुरुवात झाली असुन वीज कामगार,अधिकारी, अभियंते संपावर गेले आहेत. संपामुळे वीज पुरवठ्यावर अनेक ठिकाणी परिणाम झालेला आहे. संपात मावळ परिसरातील वीज महानिर्मितीचे जलविद्युत केंद्र पवनानगर, महापारेषणचे १०० के.व्ही. उपकेंद्र तळेगाव दाभाडे, २२० के.व्ही उपकेंद्र उर्से, २२० के.व्ही उपकेंद्र आंबी, १००के.व्ही. उपकेंद्र लोणावळा(वरसोली), १०० के.व्ही. उपकेंद्र आंद्र-लेक, १००के.व्ही उपकेंद्र पवनानगर आणि महावितरण उपविभागाचे एकूण २५० ते २८० कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपात उतरले आहेत. तळेगाव, तळेगाव स्टेशन परिसरातील सीआरपीएफ, पणन मंडळ, स्वराज नगरी म्हाळसकर वाडी आदी ठिकाणचा विद्युत पुरवठा सकाळी ९.३० पासुन बंद पडला आहे.

Back to top button