परभणी: पूर्णा येथील पारधी समाजातील १५ जणांनी पहिल्यांदाच केले मतदान

पूर्णा, पारधी समाज
पूर्णा, पारधी समाज


पूर्णा: शहरातील क्रांतीनगरात रहिवाशी झालेल्या भटके विमुक्त पारधी समाजातील १५ जणांना भारतीय नागरीकत्व मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच आज (दि.२६) येथील जिल्हा परिषदे माध्यमिक शाळेतील बुथवर परभणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यात ९ महिला आणि ६ पुरुषाचा समावेश होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव दिसून आला.

भटके विमुक्त पारधी जमातीतील सीता धर्मराज भोसले, धर्मराज यंकप्पा भोसले, टोपक्या गंगाप्पा भोसले, श्रीदेवी बसराज पवार, रेणुका बसराज पवार, यंकप्पा गंगप्पा भोसले, भागम्मा यंकप्पा भोसले, गंगाबाई शंय्यम पवार, शंकाई अजय पवार, शेषकला शंकर भोसले, शंकर परसराम भोसले, सुशिला श्याम पवार, श्याम दशरथ पवार यांनी मतदानाचा प्रथमच हक्क बजावला.

भटके विमुक्त पारधी जमातीचे लोक टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत पूर्णा शहरात मागील १४ वर्षांपासून वास्तव्यास होते. परंतु, त्यांना कोणत्याही मुलभूत गरज सुविधा तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता. अशा भटक्या विमुक्त पालात राहणा-यांचा सर्व्हे करण्याच्या सुचना प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी दिल्या होत्या. प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे यांच्या पुढाकाराने निवडणूक विभाग बीएलओच्या पडताळणीनंतर भारतीय नागरिकत्व बहाल करुन मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news