व्हॉट्स ॲप वापरताना ‘ही’ चूक टाळा, अन्‍यथा बॅन होईल खाते; देशात 23 लाखांहून अधिक खाते बंद | पुढारी

व्हॉट्स ॲप वापरताना 'ही' चूक टाळा, अन्‍यथा बॅन होईल खाते; देशात 23 लाखांहून अधिक खाते बंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : WhatsApp युजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक निर्णय घेत आहे. आयटी नियमांनुसार  व्हॉट्स ॲपने 2022 मध्ये 23 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन केली आहेत.  यूजर सेफ्टी मंथली रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की, यूजर्सची तक्रार करण्यापूर्वी 10 लाख खाती बॅन करण्यात आली होती.

एका युजर्सच्या तक्रारीनंतर व्हॉट्स ॲपने ही मोठी कारवाई केली आहे.  रिपोर्ट फीचरद्वारे युजर्सनी  खात्यांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्‍यांचे अकाऊंट्स बंद करण्यात आले. व्हॉट्स ॲपवर ५९८ तक्रारी आल्या असून, त्यापैकी १९ खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकूण 23 लाख 28 हजार भारतीय व्हॉट्स ॲप अकाउंटस्‌ बॅन केली आहेत, असे व्हॉट्स ॲपकडून सांगण्यात आले .

व्हॉट्स ॲप आपले प्लॅटफॉर्म युजर्ससाठी सुरक्षित करण्यासाठी ही पावले उचलत आहे. अनेक  प्रायव्हसी फीचर्स देण्यात आले आहेत, परंतु एक खास फीचर देखील व्हॉट्स ॲपमध्ये आहे. जेणेकरुन युजर्स कोणत्याही चुकीच्या गोष्टीची तक्रार करू शकतात. वापरकर्त्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, सर्व तक्रारींचे पुनरावलोकन केले जाते आणि भारताच्या कायद्यांचे किंवा WhatsApp सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर बंदी घातली जाते.

अशी करा व्हॉट्स ॲपवर तक्रार

व्हॉट्स ॲप खात्याबाबत समस्या आल्‍यास wa@support.whatsapp.com वर मेल पाठवून समस्येबद्दल सांगता येते. तसेच अहवाल देण्यासोबत, पुराव्यासाठी स्क्रीनशॉट पाठवावे. तर दुसरा मार्ग म्हणजे WhatsApp चॅट उघडणे आणि नंतर वरच्या उजव्या बाजूला दर्शविलेल्या तीन डॉट मेनूवर टॅप करणे. टॅप केल्यानंतर रिपोर्ट ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करूनही तक्रार नोंदवता येते.

हेही वाचा

Back to top button