रत्नागिरी: विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह 200 फूट खोल दरीत आढळला | पुढारी

रत्नागिरी: विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह 200 फूट खोल दरीत आढळला

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरातील फगरवठार येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉइंट खाली 200 फूट खोल दरीत आढळला. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सायंकाळी उशिरापर्यंत माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाच्या मदतीने तिचा मृतदेह रॅपलिंगच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढला. दरम्यान घातपताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रितेश घाणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानूसार, गुरुवारी (दि.29) त्यांची पत्नी तन्वी घाणेकर (33,रा.खालचा फगरवठार,रत्नागिरी) ही रोजी सायंकाळी 7.15 वा. सुमारास मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून दुचाकी (एमएच 08 एक्स 7116) वरुन बाजारात गेली होती. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न आल्याने पती रितेशने दुस-या दिवशी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती.

याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांना तन्वी घाणेकर हिची दुचाकी भगवती किल्ला नजीक दोन दिवसांपूर्वी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातच शोध मोहीम सुरु केली. अखेर सोमवारी (दि.3) सकाळपासूनच भगवती किल्ला, कपल पॉईंट, टकमक पॉईंट, लाईट हाऊस परिसरात समुद्राच्या बाजूने शोध मोहिम केली. सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास पोलिसांनी भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉईंट खाली सुमारे 200 फूट दरीमध्ये जाऊन शोधाशोध केल्यानंतर एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृत्यू मृतदेह ज्या ठिकाणी आहे तेथून बाहेर येण्यासाठी मार्ग नसल्याने माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाने रोपच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. दरम्यान तीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मुतदेह आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. तसेच शहरात वाढत्‍या घातपाताच्या घटनांमूळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा

रत्नागिरी: महिला पोलिसाला शिवीगाळ; आरोपीला कारावासाची शिक्षा  

नवरात्रीच्या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा 

औरंगाबाद : दसरा मेळाव्यासाठी ‘एसटी’ बसेस जाणार मुंबईला; प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय

Back to top button