नवरात्रीच्या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा | पुढारी

नवरात्रीच्या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज ( ३ ऑक्टो) आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती या रूपात पूजा बांधण्यात आली.

या रूपामध्ये जगदंबा फक्त देव मानव यांचीच नव्हे तर अगदी दैत्यांची सुद्धा माता आहे म्हणूनच हे सर्वजण तिला आदराने नमन करतात. अशा परिस्थितीत मार्ग चुकलेल्या आपल्या मुलांसाठी आईला जसे प्रसंगी कणखर व्हावे लागते. एरवीचे सोज्वळ रूप टाकून उग्र रूप घ्यावे लागते तसेच महिषासुरा सारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करूणामय जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले. शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले, तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला अशी आख्यायिका आहे. त्याला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते. जगदंबा महिषासुरमर्दिनी आपल्या मनातल्या कामक्रोधादी विकारांचा संहार करून निर्मळ सोज्वळ भक्तीचे दान देवो हाच जगदंबा चरणी जोगवा.

हेही वाचा

Back to top button