एसटी चालकाची माळशेज घाटात आत्महत्या | पुढारी

एसटी चालकाची माळशेज घाटात आत्महत्या

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा

माळशेज घाटातील (जि. ठाणे) बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत उडी मारुन एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना  ८ जून राेजी दुपारी घडली. गणपत मारुती इदे असे त्याचे नाव असून ते अकोले आगारात काम करत होते.

अकोले-कल्याण ही बस घाटात थांबली असता गणपत इदे यांनी दरीत उडी घेऊन आपले आयुष्य संपविले. इदे यांना ८ जून राेजी पगार मिळाला होता, मात्र एसटी संपानंतर ड्युटी मिळत नसल्याने पगार फारच कमी मिळाल्याची चर्चा होती. तसेच ते मानसिक तणावाखाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कल्याणला निघालेल्या इदे यांना कल्याणहून बसवर चालकाची ड्युटी देण्यात आली होती.

आत्महत्येनंतर १५० फूट दरीतुन इदे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जुन्नर आपत्ती व्यवस्थापन टीमला दोन तासांचा अवधी लागला. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रशांत कबाडी, रमेश खरमाळे, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, श्याम कबाडी, लखन डाडर, संकेत बोंबले आदींनी मदतकार्य केले.

हेही वाचा 

निपाणी : भर पावसात ॲम्बुलन्ससाठी वाट करून देत पोलिसाने जोपासली माणूसकी

मिरजेत ३ लाख ५६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकले मगरीचे पिल्लू; पुलाची शिरोली परिसरात घबराहट

Back to top button