मिरजेत ३ लाख ५६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त | पुढारी

मिरजेत ३ लाख ५६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथे बनावट नोटा घेऊन जाणार्‍या तिघांवर पोलिसांनी छापा टाकून ३ लाख ५६ हजार १७० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्‍या. यामुळे जिल्ह्यातील बनावट नोटांचे कनेक्शन पुन्हा बाहेर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जान नालबंद (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि शब्‍बीर साहेबहुसेन पिरजादे (रा. गुरूवार पेठ, मिरज, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (दि. १०) पर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे.

तिघे संशयित आरोपी बनावट नोटा घेऊन मिरजेतून कृष्णाघाटच्या दिशेने एका कारमधून जात होते. महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक मंगळवारी मध्यरात्री कृष्णाघाट रस्त्यावर तैणात करण्यात आले होते. विनानंबर प्लेटची कार कृष्णाघाट रस्त्यावरील एका वीटभट्टी जवळ आल्यानंतर पोलिसांनी त्या कारला थांबवून तपासणी केली. यावेळी कारमध्ये ‘भारतीय बच्चो का बँक’ असा उल्लेख असलेल्या नोटांची 55 बंडल सापडले. परंतु बनावट नोटा ओळखून येऊ नयेत यासाठी त्या बंडलच्या वर पाचशे रुपयांच्या काही खर्‍या नोटा लावण्यात होत्या. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटेसारखे हुबेहुब दिसणारे ‘भारतीय बच्चों का बँक’ असा उल्लेख असलेल्या व त्यावर दोन हजार रुपये असा उल्लेख असलेले 45 बंडल मिळून आले. पोलिसांनी असे एकूण ३ लाख ५६ हजार १७० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्‍या.

हेही वाचा  

Back to top button