निपाणी : भर पावसात ॲम्बुलन्ससाठी वाट करून देत पोलिसाने जोपासली माणूसकी | पुढारी

निपाणी : भर पावसात ॲम्बुलन्ससाठी वाट करून देत पोलिसाने जोपासली माणूसकी

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : निपाणी येथे विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसात बसस्थानकाबाहेरील धर्मवीर संभाजी महाराज चौकात वाहनाची मोठी गर्दी झाली होती. भर पावसात शहर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने ॲम्बुलन्सला या गर्दीतून वाट करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली. या पोलिस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पावसात रुग्णवाहिकेला वाट करून देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव के.बी.दड्डी असे आहे. पोलीस कॉन्स्टेबल दड्डी हे सध्या शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांची दुपारी 2 ते सायंकाळी 8 या वेळेसाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे ड्युटी होती. सायंकाळी पाचच्या सुमारास जोरात पाऊस सुरु झाला. त्यामुळे चौकात चोहोबाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी चिकोडी येथुन भरधाव वेगाने आलेल्या व कोल्हापूरकडे निघालेल्या खासगी ॲम्बुलन्सला वाट मिळणे मुश्किल झाले होते. हे लक्षात येताच चौकात थांबलेल्या पोलीस कर्मचारी दड्डी यांनी वेगात आलेल्या ॲम्बुलन्सला वाट करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी चौकात थांबलेल्या वाहनधारकासह, व्यावसायिक, उद्योजक व नागरिकांनी सदर पोलीस कर्मचार्‍यांचे कौतुक केले. सदर कर्मचाऱ्याचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. दरम्यान या कर्मचा-याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हेही वाचा  

Back to top button