नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन | पुढारी

नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन

नागपुर ; पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. नाईक यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारा नेता गमावल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले. नाईक यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button