‘रोजगार हमी’त कर्जत,जामखेड टॉपर; एका वर्षात 4 लाख 50 हजार रोजगार निर्मिती | पुढारी

‘रोजगार हमी’त कर्जत,जामखेड टॉपर; एका वर्षात 4 लाख 50 हजार रोजगार निर्मिती

जामखेड : पुढारी वृतसेवा

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी रोजगार गरजेचा आहे. हेच ओळखून आमदार रोहित पवार यांनी रोजगार हमी योजनेला चालना दिली आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी व मजूर यांचा समन्वय ठेवल्याने नगर जिल्ह्यात कर्जत नंबर वन, तर जामखेड नंंबर दोनवर आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात एका वर्षात 4 लाख 50 हजारांपेक्षा रोजगार निर्मिती करत अव्वल स्थान पटकावले आहे. आ. रोहित पवार हे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा, प्रशासनातील अडचणी सोडवत असल्याने प्रशासन अधिक गतिमान होताना दिसत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये मागील वर्षी व चालू वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे.

सन 2021 22 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात 2 लाख 55 हजार 255 रोजगार निर्मिती झाली असून 9.93 कोटी एवढा एकूण खर्च झालेला आहे, तर जामखेड तालुक्यात 2 लाख 9 हजार 217 मनुष्यदिन निर्मिती झाली असून, 10.84 कोटी रुपये खर्च झालेला आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये कर्जत पहिल्या क्रमांकावर, तर जामखेड दुसर्‍या क्रमांकावर आहे.

चांगला कोर्स-कॉलेजची निवड ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली : प्रा. राजेंद्र जाधव

चालूवर्षी जामखेड तालुक्यात 22904 रोजगार निर्मिती झाली असून जामखेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. आज रोजी जामखेड तालुक्यात 134 कामे सुरू असून 1314 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. यामध्ये घरकुल, फळबाग, सिंचन विहीर, रस्ते, वृक्ष लागवड अशी विविध कामे चालू आहेत. आमदार रोहित पवार यांचे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे.

अनुभवी अधिकार्‍यांमुळे आलेख उंचावला

रोजगार हमी योजनेला चालना देण्यासाठी कर्जत व जामखेडला अनुभवी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे राज्यस्तरावर रोजगार हमी योजनेला मार्गदर्शक सूचना सुचवत आहेत. त्यांच्या माध्यमातून जामखेड रोजगार हमीला बुस्टर डोस देण्याचे काम देखील अधिकारी यांनी केले त्यामुळे दोन्ही तालुक्यात रोजगार हमीचा वाढता आलेख पाहण्यास मिळत आहे.

हेही वाचा

कण्हेरी ग्रामस्थांचा प्रभाग रचनेवर आक्षेप

बांदा : भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार

सांगलीत प्रज्वलित होणार अखंड शिवज्योत

Back to top button