गोवा : आयुष विभागातील पाच प्रकारचे उपचार करणारे देशातील पहिले रूग्णालय सुरू | पुढारी

गोवा : आयुष विभागातील पाच प्रकारचे उपचार करणारे देशातील पहिले रूग्णालय सुरू

पणजी; पुढारी वृत्तसेवा: गोव्यात आयुष विभागातील पाच प्रकारचे उपचार करणारे देशातील पहिले रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या हस्ते रूग्णालयाचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद उपचार पध्दतीला प्राधान्य देऊन गोव्याला केंद्र बनवले. युनानी, सिद्धा, नॅचरोपॅथी, योगा, आयुर्वेद व होमिओपॅथी अशा विविध प्राचीन उपचारांचे मोफत उपचार व संशोधन केंद्र सुरू केले. गोव्यामध्ये धारगळ येथे भव्य आयुष पदवी महाविद्यालय रूग्णालय सुरू केल्यानंतर रायबंदर येथे आयुष पेथी आरोग्य उपचार केंद्र सुरू झाले आहेत. यामुळे विविध पाच विभागाचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले देशातील पहिले रूग्णालय असणार आहे.

जगामध्ये आयुष उपचार पद्धतीला स्विकारल्याचे आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी सांगितले आहे. तर गोमंतकीयांना मोफत उपचार पद्धत उपचार घेण्याची सोय झाली आहे. आयुष विभागातील आयुर्वेद डॉक्टरांना आता घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिपादन केले.

हेही वाचा : 

Back to top button