नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ | पुढारी

नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थिती राहता किंवा नाही यावरुन चर्चा होती. त्यावर बोलताना, छगन भुजबळ यांनी आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी असे स्पष्ट केले आहे. मला आधी माझे कार्यकर्ते आणि मतदारसंघ महत्वाचा वाटतो असे भुजबळ म्हणाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच आज येवला दौऱ्यावर जात आहेत. त्यासाठी ते ओझर विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येवल्यात शक्तीप्रदर्शन करणार का असे विचारले असता भुजबळ म्हणाले, शक्तिप्रदर्शन कुणासाठी कशाला करायचे ? येवल्याला बरेच दिवस झाले गेलो नव्हतो. त्यात कार्यकर्त्यांचाही आग्रह होता. शपथ घेतल्यानंतर फक्त नाशिकला आलो. अधिवेशन सुरु झाल्यानंतर जाता येणार नाही म्हणून जातो आहे.

तसेच, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांनी पहीली सभा येवल्यात भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. त्याला हे उत्तर असणार का या प्रश्नावर बोलताना, पवार साहेबांच्या सभेला उत्तर देण्यासाठी चाललो नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. भुजबळ म्हणाले, आमच्या रात्री पर्यंत मिटिंग सुरू होत्या. नंतर परत कॅबिनेट मीटिंग देखील आहे त्यामुळे जाणे अवघड होईल. त्यामुळे येवल्याला जातोय.

खातेवाटपा संबधात विचारले असता, खात्याची वाटणी झाली आहे. सत्तेत तिसरा गट जातोय त्यामुळे कुणाची तरी खाती काढावी लागणार आहे तेव्हाच खाते मिळते. तसेच मी कोणतीही मागणी केली नाही. सगळी ताकदीची खाते घेऊन झाली आहे.  त्यामुळे सर्व जण जे ठरवतील ते खाते मिळेल असे भुजबळ यावेळी म्हणाले. तसेच 23 तारखेला अजित पवार उत्तर सभा घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे भुजबळांनी सांगितले.

Back to top button