Tomato Prices :उत्तर प्रदेशात नेपाळमधून आणलेले ३ टन टोमॅटो जप्त | पुढारी

Tomato Prices :उत्तर प्रदेशात नेपाळमधून आणलेले ३ टन टोमॅटो जप्त

लखनऊ: पुढारी ऑनलाईन : नेपाळमधून अवैधपणे भारतात आणले जाणारे ३ टन टोमॅटो सीमाशुल्क अधिकार्‍यांनी जप्त केले. महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा भागाजवळ पोलिस आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.७) केली. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात टोमॅटो १६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर टोमॅटोची (Tomato Prices)  किंमत नेपाळमध्ये कमी आहे.

टोमॅटोची (Tomato Prices)  ही तस्करी खूप मोठी मानली जात होती. सुमारे ४.८ लाखांचे टोमॅटो जप्त करण्यात आले आहेत. नियमानुसार, जप्त केलेल्या नाशवंत वस्तू २४ तासांच्या आत नष्ट कराव्या लागतात. मात्र, पोलिसांनी लखनौ मुख्यालयातील सीमाशुल्क अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

लखनौच्या सीमाशुल्क आयुक्त आरती सक्सेना यांनी सांगितले की, शुक्रवारी महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल भागाजवळ एसएसबीच्या पथकाने प्रत्येकी १.५ टन टोमॅटो असलेली दोन वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एसएसबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेपाळमध्ये उत्पादित किंवा तयार नसलेल्या वस्तूंना भारतात परवानगी दिली जात नाही.

निचलौलचे एसएचओ आनंद कुमार गुप्ता यांनी सांगितले की, नाशवंत वस्तूंसाठी शुल्क भरणे आवश्यक आहे. अशा वस्तू भारतात प्रवेश करण्यासाठी त्याची प्रमाणित प्रत तयार करणे आवश्यक आहे. ड्युटी न भरता खरेदी केल्यास आम्ही दागिने, विदेशी चलन, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या वस्तू जप्त करू शकतो.

हेही वाचा 

 

Back to top button