Tata Tiaga EV : टाटाच्या सर्वात स्वस्त नव्या इलेक्ट्रीक कारचे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू | पुढारी

Tata Tiaga EV : टाटाच्या सर्वात स्वस्त नव्या इलेक्ट्रीक कारचे बुकिंग 'या' तारखेपासून सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुम्ही तुमची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आता आली आहे. Tata Motors ने अखेर आपली बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiaga EV लाँच केली आहे.

या कारची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये इतकी असणार आहे. Tiago EV ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 315 किमी इतकी मायलेज देईल. या कारचे बुकिंग पुढील महिन्यात म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जानेवारी 2023 पासून या इलेक्ट्रिक कारचे वितरण केले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. DC फास्ट चार्जरच्या सहाय्याने Tiago ची बॅटरी 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतील.

Tata Tiago EV 7 प्रकारात येईल

टाटा कंपनीने ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 7 प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. हे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग पर्यायांसह येईल. हे XE, XT, XT, XZ+, XZ+Tech LUX, XZ+ आणि XZ+Tech LUX व्हेरियंटमध्ये येईल. तसेच 19.2 KWh ते 24 KWh पर्यंतच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल. यामध्ये 3.3 KV AC ते 7.2 KV AC पर्यंत चार्जिंग पर्याय मिळतील. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असेल.

हेही वाचा

Back to top button