Irfan Pathan : इरफान पठाण याच्या फटकेबाजीने इंडिया लिजंडस् अंतिम फेरीत | पुढारी

Irfan Pathan : इरफान पठाण याच्या फटकेबाजीने इंडिया लिजंडस् अंतिम फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था : इरफान पठाण (Irfan Pathan) (12 चेेंडूंत 39 धावा) व नमन ओझा (90) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंडिया लिजंडस् संघाने रोड सेफ्टी वर्ल्डसीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. इंडिया लिजंडस्ने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया लिजंडस्वर 5 विकेटस् राखून विजय मिळवला. काल पावसामुळे हा सामना स्थगित करावा लागला होता आणि तो आज पूर्ण झाला. इरफानने 5 षटकार व 1 चौकार खेचताना 12 चेंडूंत नाबाद 39 धावा करून 4 चेंडू राखून इंडिया लिजंडस्चा विजय पक्का केला.

इंडिया लिजंडस् संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शेन वॉटसन व अ‍ॅलेक्स डुलान यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. राहुल शर्माने ही भागीदारी तोडली अन् 21 चेंडूंत 30 धावा करणार्‍या वॉटसनचा झेल रैनाने टिपला. त्यानंतर युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर डुलान (35) यष्टिचित झाला. बेन डंक भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत होता. (Irfan Pathan)

16व्या षटकात अभिमन्यू मिथुनच्या गोलंदाजीवर डंकने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. तिथे उभ्या असलेल्या सुरेश रैनाने हवेत झेप घेत चेंडू पकडला अन् डंकला माघारी जाण्यास भाग पाडले. डंकने 26 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया लिजंडस्ने 17 षटकांत 5 बाद 136 धावा केल्या होत्या. कॅमेरून व्हाईटने 18 चेंडूंत नाबाद 30 धावा करताना ऑस्ट्रेलियाला 5 बाद 171 धावांपर्यंत मजल मारून दिली. (Irfan Pathan)

प्रत्युत्तरात सचिन तेंडुलकर (10), सुरेश रैना (11), युवराज सिंग (18), स्टुअर्ट बिन्नी (2) व युसूफ पठाण (1) हे आज अपयशी ठरले. शेन वॉटसनने दोन विकेटस् घेतल्या. सलामीवीर नमन ओझा व इरफान पठाण यांनी निर्णायक खेळी केली. नमनने 62 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 90 धावा केल्या. तर इरफानने 308 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना 12 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 37 धावा करून संघाला 4 चेंडू राखून विजय मिळवून दिला.

अधिक वाचा :

Back to top button