Mukesh Ambani Z+ Security : उद्योगपती मुकेश अंबानी यांना सरकारकडून झेड सुरक्षा जाहीर | पुढारी

Mukesh Ambani Z+ Security : उद्योगपती मुकेश अंबानी यांना सरकारकडून झेड सुरक्षा जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना सरकारकडून झेड सुरक्षा जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणास्तव ही सुरक्षा देण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन, 65 वर्षीय अंबानी यांना 2013 मध्ये पहिल्यांदा CRPF कमांडोचे ‘Z’ श्रेणीतील सुरक्षा (Mukesh Ambani Z+ Security) देण्यात आली होती.

नीता अंबानी यांना देखील ‘Y+’ श्रेणीतील सुरक्षा असल्याचे सांगितले जात आहे. एका अहवालानुसार, अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 10 व्या क्रमांकावर आहेत. सूत्रांनी सांगितले की, अंबानी यांच्या सुरक्षेत टॉप-क्लास असणारी Z+ अशी सुरक्षेत सुधारणा करण्यात आली आहे आणि या संदर्भात आवश्यक संवाद लवकरच केला जाईल.

केंद्रीय गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सीजना अंबानी यांच्या जीवाला धोका असल्याचे समजते, तसेच तशा प्रकारच्या धमक्या अंबानी यांना आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना ही सुरक्षा देण्याची घोषणा केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) सध्याचे कव्हर ‘Z+’ पर्यंत वाढवण्यास सांगण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा युनिटमध्ये आणखी कमांडो सामील केले जाऊ शकतात.

Back to top button