Ashwini Upadhyay : ‘संविधानमुळे नव्हे तर हिंदूंमुळे भारतात शांतता टिकून‘; सर्वोच्च न्यायालयातील वकीलाचे वक्तव्य | पुढारी

Ashwini Upadhyay : ‘संविधानमुळे नव्हे तर हिंदूंमुळे भारतात शांतता टिकून‘; सर्वोच्च न्यायालयातील वकीलाचे वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी आणली. याशिवाय या आधी देशभरात विविध ठिकाणी छापे टाकत यातील संशयिताना ताब्यात घेण्यात आले. यानंतर देशभरात एकच गदारोळ उठला. यासह अनेक ठिकाणी पीएफआय घेऊन चर्चा घडू लागल्या. अशातच एका वृत्तवाहिनी वरील चर्चे दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील वकीलांनी या देशात संविधानामुळे नव्हे तर हिंदुंमुळे शातंता टिकून असल्याचे आक्षेपार्ह विधान केले आहे. (Ashwini Upadhyay)

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील अश्विनी उपाध्याय (Ashwini Upadhyay) यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान त्यांनी पीएफआय बरोबरच काँग्रेसवर देखील सडकून टिका केली. यावेळी काँग्रेसवर टिका करताना अश्विनी उपाध्याय म्हणाले, जेव्हा पीएफआयवर बंदी घालण्यात आली तेव्हा तिकडे काँग्रेसने पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्वीजय सिंह यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. ते उद्या काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होतील. पण, हेच दिग्वीजय सिंह या पीएफआयच्या कार्यक्रमास उपस्थित राहून स्टेजवर महत्त्वाचे स्थान ग्रहण करायचे. ते या संघटनेचे समर्थक आहेत.

याच दिग्वीजय सिंह यांनी बाटला हॉऊस येथील एन्काउंटरला फेक एन्काउंटर म्हटल होत. हेच दिग्वीजय सिंह ओसामला आणि दाऊदला ओसामाजी आणि दाऊदजी म्हणतील. पीएफआय संघटनेचे कंबरडे मोडले आहे ती संघटना संपुष्टात येईल पण, त्यांचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेसचा अध्यक्ष बनेल याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असे देखिल या कार्यक्रमादरम्यान वकील अश्विन उपाध्याय (Ashwini Upadhyay) म्हणाले.

या देशातील सुख शांतता आणि येथील धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे प्रस्तापित झाली नसून ती येथील हिंदूंमुळे प्रस्तापित झाली आहे. या देशात ९० टक्क्यांहून अधिक हिंदू होते पण ती संख्या आता ७८ टक्क्यांवर आली असल्याचे अश्विन उपाध्याय (Ashwini Upadhyay) म्हणाले.

अश्विन उपाध्याय पुढे म्हणाले, पीएफआय सारखी संघटना देशात दहशत पसरवते, दंगे घडवून आणते, धर्मांतर घडवते लव जिहादला समर्थन देते. यांना परदेशातून निधी येतो आणि ते इस्लामला जे मानत नाही त्या सर्वांना काफिर असल्याचे समजतात. अशा या संघटनेला कोण समर्थन करत आहे ते पहा. या देशात जिथे हिंदूवर अन्याय झाला तेथून धर्मनिरपेक्षता नष्ट झाली आहे. ज्या राज्या हिंदूंवर अन्याय झाला तेथे धर्मनिरपेक्षता नाही. काश्मीर, लढाख आणि लक्षद्विपसारख्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता नाही. फक्त हिंदूमुळे बुंधूभाव आणि धर्मनिरपेक्षता टिकून असल्याचा पुनर्रुचार उपाध्याय यांनी केला.


अधिक वाचा :

Back to top button