डोळ्यांवर परिणाम करणारा लोआईसिस ओळखा, काय आहेत लक्षणे, उपाय | पुढारी

डोळ्यांवर परिणाम करणारा लोआईसिस ओळखा, काय आहेत लक्षणे, उपाय

डॉ. संतोष काळे

मानवी शरीराचे महत्त्वाचे अंग म्हणजे डोळा. त्याला इजा होणे किंवा त्रास होणे म्हणजे तुमचे आयुष्य अंधकारमय होऊ शकते. त्यामुळेच डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोआईसिस या रोगातही डोळ्यांची योग्य वेळी काळजी घेतली गेली पाहिजे.

त्वचा आणि डोळ्यांच्या वाढत्या समस्या

लोआईसिसला आफ्रिकन आय वर्म किंवा फ्युजिटिव स्वेलिंग या नावांनी ओळखलं जातं. या रोगात डोळ्यांबरोबर त्वचेवर परिणाम होतो. लोआईसिसमध्ये डोळ्यांच्या पापण्यांवर लोआ लोआ या परजीवी जंतूचा प्रादुर्भाव होतो. माशीमुळे हा जीव माणसांपर्यत पोहोचतो. डोळ्यात हा जंतू गेला तर तो डोळ्यावर फिरताना दिसू शकतो.

संबंधित बातम्या 

त्रास आणि वेदना

या जंतूच्या प्रादुर्भावामुळे डोळ्याला त्रास आणि दुखणे सुरू होते. या जंतूमुळे डोळ्याची बघण्याची क्षमता फार कमी होत नसली, तरी या जंतूच्या डोळ्यात असण्याने जी असहजता येते आणि दुखणे सुरू होते त्यामुळे मनुष्याला अडचणी येतात.

त्यामुळे या रोगावर त्वरित इलाज होणे महत्त्वाचे आहे. या रोगात डोळ्याच्या खालच्या पापणीला खाज सुटून डोळा सुजून लाल होतो. सुजेमुळे डोळा दुखायला लागतो. कॅलिबर सूज नावाने ती ओळखली जाते.

जंतूची वाढ

हा जंतू माशीच्या चावण्यामुळे शरीरात प्रवेश करतो. ही माशी दिवसाच आपल्याला चावते. या जंतूची अळी शरीरात प्रवेश करते. नावाप्रमाणे जागून ती आपल्या शरीरातून अन्न मिळवूनच स्वतःचे पोषण करीत असते. मग ती अळी स्वरूपात शरीरात राहते. त्यानंतर हा जंतू आपली संख्या फटाफट वाढवतो. हे जंतू मानवी शरीरात पंधरा वर्षे टिकून राहू शकतात.

लक्षणे ओळखा

या रोगाची लक्षणे उशिरा समजतात; पण ती स्पष्टपणे कळतात. यामुळे येणारी सूज आणि दुखणे याबरोबरच त्वचा लाल होणे, कंड येणे ही लक्षणे दिसू शकतात. जर हा जंतू डोळ्यावर फिरत असेल, तर त्रास अधिकच वाढतो. काही लोकांमध्ये हातावर आणि पायांवरही कॅलिबर सुजेची लक्षणे दिसतात. ( लोआईसिस )

या सुजेची गाठ झाली, तर मात्र परिस्थिती गंभीर होते. हे जीव डोळ्यांव्यतिरिक्त अन्य अवयवांमध्येही शिरकाव करू शकत असल्याने ते जिथे असतील तिथे ही सूज येऊ शकते. संवेदनशील अवयवांमध्ये यांचा शिरकाव झाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. जर मेंदूत हा जीव शिरला तर इनसिफेलाईटिस हा रोग होऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपचाराशिवाय पर्याय नाही.

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

नेहमीची आरोग्य आणि रक्ताच्या तपासणीने या रोगाची लक्षणे कळू शकतात. जर परिस्थिती अधिक गंभीर झाली, तर शस्त्रक्रियेने उपचार शक्य आहेत. भारतात या रोगाचे प्रमाण फारसे आढळत नाही, पण काही थोडे रुग्ण पाहायला मिळतात. स्वच्छता आणि योग्य सावधानता, काळजी घेतल्यास हा रोग होणार नाही.

Back to top button