अंटार्क्टिकावर दिसली उडती तबकडी? | पुढारी

अंटार्क्टिकावर दिसली उडती तबकडी?

न्यूयॉर्क ः ‘गुगल अर्थ’वर नेहमीच रहस्यमय गोष्टींचा शोध घेतला जात असतो. ‘गुगल अर्थ यूजर्स’ अनेक वेळा अशा रहस्यमय गोष्टी पाहण्याचा दावा करतात जे थक्क करणारेच असतात. आता एका गुगल यूजरने असाच भन्नाट दावा केला आहे. त्याने अंटार्क्टिकाच्या बर्फावर हृदयाच्या आकाराची (म्हणजे ‘दिल शेप’) आकृती पाहिली असल्याचे व ही आकृती म्हणजे कदाचित ‘यूफो’ असल्याचा दावा त्याने केला आहे.

यापूर्वीही गुगल यूजर्सनी सैन्य विमानांच्या ठिकाणांपासून ब्लॅक आऊट बेटांपर्यंत रहस्यांना शोधले आहेत. या अ‍ॅप्लिकेशनने अशाही विचित्र ठिकाणांचा शोध घेतला आहे ज्याबाबत अद्यापही कुणाला माहिती नव्हती. बर्फाच्छादीत असलेल्या दक्षिण ध—ुवावर म्हणजेच अंटार्क्टिकावर आता या गुगल यूजरने एक रहस्यमय तबकडी पाहिली आहे. हा गुगल यूजर म्हणजे प्रसिद्ध ‘एलियन हंटर’ (परग्रहवासी शोधणारा) स्कॉट वॉरिंग हा आहे.

त्याने गुगल अर्थ अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून ही ‘उडती तबकडी’ म्हणजेच ‘यूफो’ शोधली असल्याचे म्हटले आहे. ही वस्तू म्हणजे एलियन्सचे दुर्घटनाग्रस्त अंतराळयान असू शकते असा त्याचा दावा आहे. त्याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. त्याने म्हटले आहे की ही 40 मीटरची डिस्क एखाद्या बसलेल्या हृदयासारखी आहे.

निर्मनुष्य आणि दुर्गम असा हा दक्षिण ध—ुव एलियन्ससाठी चांगला ठिकाणा आहे. या ठिकाणी एलियन्सचा छुपा ठिकाणा असू शकतो. अर्थात काही तज्ज्ञांनी म्हटले आहे की ही दुर्घटनाग्रस्त ‘यूफो’ नाही. बर्फ तुटल्यामुळे अंटार्क्टिकामध्ये अनेक वेळा अशा आकृत्या दिसून येत असतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button