Rajeshwari Kharat : ‘आधीच सांगतोय पृथ्वी धोक्यात येईल अशाने…’🏃🥰 | पुढारी

Rajeshwari Kharat : 'आधीच सांगतोय पृथ्वी धोक्यात येईल अशाने...'🏃🥰

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘फॅंड्री’ (Fandry) या चित्रपटातील ‘शालू’ ची भूमिका खूपच गाजली. या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही. परंतु, तिचा अभिनय चाहत्यांच्या मनात घर करून गेला. ‘शालू’ ची भूमिका या चित्रपटात राजेश्वरी खरातने (Rajeshwari Kharat) ने साकारली आहे. सध्या तिच्या आणखी एका फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी नऊवारी साडीतील आणि हॉट फोटोज शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत तिने न्यूजपेपरपासून बनविलेला एक ड्रेस परिधान केला होता. यानंतर मात्र, तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच दरम्यान तिने सध्या आणखी एक लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत राजेश्वरीच्या सौंदर्य खुलून दिसत आहे. याशिवाय तिने आपले केस मोकळे सोडले असून तिच्या मागे निसर्गाचे सौंदर्य दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने ‘मी आधीच सांगून ठेवतोय पृथ्वी धोक्यात येईल अशाने. एवढं सुंदर असतं का कोणी?.’ तर दुसऱ्या एकाने ‘भट्टीत आग लागल्यागत दिसते’ असे लिहिले आहे. याशिवाय आणखी एकाने ‘गालावर कळी डोळ्यात धुंदी… माझा रंग घे तुझा रंग मला दे…’ आणि ‘रिअल रेड रोज… ‘असे कमेंट्समध्ये लिहिले आहे. याशिवाय फायर आणि हार्टचा ईमोजी देखील चाहत्यांनी शेअर केला आहे.

याआधाही राजेश्वरीने परिधान केलेल्या पेपर डिझाईन ड्रेसवर नेटकर्‍यांनी मिम्स बनवले होते. यामधील एका मिममध्ये ‘फॅंड्री’ मधील जब्याचा फोटो घेवून लिहिलं आहे की, हा पेपर फुटला पाहिजे लका, एकाने राजेश्वरीचे चार फोटो घेवून तिच्या आडनावाशी यमक जूळवून मिम केलं आहे की, राजेश्वरी खरात, राजेश्वरी घरात, राजेश्वरी दारात, राजेश्वरी पेपरात यासोबत अनेक मिम्स बनवले गेले होते. यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

राजेश्वरीने ‘फँड्री’ नंतर ‘आयटमगिरी’ या मराठी चित्रपटातून अभिनय केला. लवकरचं ती ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button