

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिने पती सॅम बॉम्बे (Sam Bombay)ने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी सॅमला अटक केली. हॉस्पिटलमधील उपचारानंतर पूनमने सॅमपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तिने आपल्या भविष्यात लग्न करायचे झाल्यास जोडीदार कशा हवा याचा खुलासा केला आहे.
पूनम पांडे (Poonam Pandey) ने दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली की, गेल्या काळात माझ्या पतीने मला मारहाण करून जो त्रास दिला त्यातून मी बाहेर पडण्याचा आणि स्वत: ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पूनमला 'तू आता सिंगल आहेस का?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, 'मी सध्या रिलेशनशिपमध्ये आहे, तेही माझ्यासोबत. एकटे राहण्यात मला आनंद वाटत आहे. हे जीवन खूपच सुंदर आहे. एकटे राहणे हेच चांगले आहे.' याशिवाय पुढील ५ वर्षे मी अविवाहितच राहणार असल्याचे तिने म्हटलं.
पूनमला विक्की कौशलसारखा नवरा हवाय
यापुढे पूनमला विचारण्यात आले की, सर्व काही ठिक असताना मग असं काय घडलं की हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं? परंतु, या प्रश्नाचं उत्तर देताना टाळाटाळ केली. यानंतर ती पुढे म्हणाली की, 'मी सध्या एका थेरेपिस्टकडे जात असून या प्रसंगातून हळूहळू बरे होण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
यावेळी तिने कॅटरिना कैफ माझ्यासाठी प्रेरणा असल्याचे सांगितले. यात तिने बॉलिवूडमध्ये कॅटरिनाने खूप चांगले यश संपादन केलं आहे. याशिवाय तिने एका चांगल्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. मला जर भविष्यात विक्की कौशलसारखा पती मिळाल्यास मला लग्न करायला आवडेल असे तिने म्हटले आहे.
पूनम पांडे गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. लग्नानंतर तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. पूनमने मुंबई पोलिसांत मारहाणीप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सॅमला अटक करण्यात आले होते. नंतर त्याला जामिनावर सोडून दिलं.
हेही वाचलंत का?